नागपूर NAGPUR : लोकायुक्त विधेयक महाराष्ट्र विधान परिषदेत मंजूर झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. राज्य सरकारचे आभार मानताना हजारे यांनी ठाकरे सरकारने केवळ आश्वासन दिले होते, पण कायदा केला नाही, असा टोला देखील लगावला.
हजारे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्याशी फोनवर चर्चा केली. हजारे म्हणाले की, ठाकरे सरकारला लोकायुक्त कायदा नको होता. देवेंद्र फडणवीस यांनी वेळ लावला पण कायदा केला, असे अण्णा हजारे म्हणाले. हे विधेयक मंजूर झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे ते म्हणाले. या जनहित विधेयकाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करून ते मंजूर करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.















