कोराडीत नव्या वीज संचाना विरोध, जनसुनावणीत राडा

0

 -विरोधक-समर्थक घोषणायुद्ध

नागपूर (Nagpur ) :महाजनकोमार्फत (Koradi)कोराडीत १३२० मेगावॉट्चे दोन नवे यूनिट सुरु करण्याचा प्रस्तावाला विरोधावरून सोमवारी कोराडीत झालेल्या जनसुनावणीत विरोध करणारे (Congress) काँग्रेस, पर्यावरणवादी,जनमंच एकीकडे तर दुसरीकडे भाजप (BJP)समर्थक, प्रहार संघटना दुसरीकडे असे घोषणायुद्ध रंगले. 90 टक्के उपस्थित या प्रकल्पाच्या समर्थनात असल्याचे चित्र दिसले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण निवळले.राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis )व माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule)यांच्यासाठी हा प्रकल्प प्रतिष्ठेचा झाला आहे.

भर उन्हात कोराडी येथे होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी गेले काही दिवस केली जात होती.मात्र, महानिर्मितीने पाणी, कोळसा, रेल्वे यंत्रणा (Water, coal, railway system)सारे असल्याने याच ठिकाणी ऊर्जा प्रकल्प करण्याची भूमिका कायम ठेवल्याने आज विरोधक एकवटले. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, विशाल मुत्तेमवार, संदेश सिंगलकर, उमाकांत अग्निहोत्री विरोध करणाऱ्यांमध्ये समोर होते. तत्पूर्वी,‘नागपूर-कोराडी क्लाईमेट क्राईसेस‘या संस्थेच्या पदाधिका-यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला. दरम्यान,हा विरोध करणारे बाहेरचे लोक आहेत.केवळ राजकारणातून विरोध होत आहे. परिसरातील 90 टक्के लोक या प्रकल्पाच्या बाजूने आहेत.13 ग्रामपंचायतीनी समर्थनात ठराव पारित केले असल्याचा दावा (Rajesh Rangari, Mayor of Mahadula.)महादूलाचे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी केला.