महाराष्ट्रातील काॅंग्रेसच्या एकमेव खासदारांचे निधन

0

 

वरोडा : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव तरूण खासदार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांचं काल उशीरा रात्री निधन झालं आहे. ते 48 वर्षांचे होते.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या 2-3 दिवसां पासून त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना रविवारला एअर अंबुलन्सने दिल्लीतील वेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन दिवसापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती . अखेर आज ( मंगळवार ) ला पहाटे त्यांची

प्राणज्योत मालवली.त्यांचा निधनाची वार्ता कळताच राजकीय वर्तुळात सर्वत्र शोककळा पसरली आहे. आज बारा वाजता त्यांचे पार्थिव वरोरा येथे आणले जात आहे.

धानोरकर यांचा जन्म 4 मे 1975 ला यवतमाळ जिल्ह्यात झाला होता.

2014 मध्ये शिवसेनेचे आमदार म्हणून भद्रावती वरोरा विधानसभेतून निवडून आले होते, त्या नंतर 2019 मध्ये शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेस कडून चंद्रपुर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातून खासदार म्हणून निवडून आले. महाराष्ट्रातून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा पराभव करीत काँग्रेस चे एकमेव खासदार म्हणून ते निवडून आले होते .

चार दिवसांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले होते.