राष्ट्रीय रोल बॉल स्पर्धेत नागपूरचा संघ व्यवस्थापक आणि खेळाडू म्हणून सहभाग

0

नागपूर: रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडिया आणि जम्मू आणि काश्मीर संघटनेच्या वतीने 19व्या सिनियर पुरुष / महिला राष्ट्रीयस्तरीय रोल बॉल स्पर्धेचे आयोजन 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2023 दरम्यान मा स्टेडियम, जम्मू आणि काश्मीर येथे करण्यात येणार आहे.
महिला संघात नागपूरची प्रख्यात सेंटर पॉईंट स्कूल वर्धमान नगर शाखा इयत्ता 12वी ची विद्यार्थीनी कु मानसी आनंद पुगलिया हिची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तसेच नागपूर जिल्हा रोल बॉल संघटनेचे सचिव श्री. शैलेंद्र पाराशर यांची महाराष्ट्र पुरुष संघाच्या आणि सौ. किरण पाराशर यांची महिला संघाच्या व्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्पर्धेकरिता सौ. किरण व श्री. शैलेंद्र पाराशर यांना आणि कु. मानसी पुगलिया ला नागपूर जिल्हा रोल बॉल संघटनेच्या वतीने स्वप्निल मदन समर्थ यांनी अभिनंदनासह शुभेच्छा दिल्यात.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा