संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन मंदिरात भाविकांची गर्दी

0

श्री संत गजानन महाराज यांचा आज 145 वा प्रकट दिन आहे. यानिमित्ताने बुलढाण्यातील शेगावात लाखो भक्तांची मांदियाळी बघायला मिळत आहे. माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन साजरा केला जातो. संत गजानन महाराज 1878 मध्ये वयाच्या 30 व्या वर्षी शेगाव इथे पहिल्यांदा दिसून आले होते. राज्यभरातील आणि शेजारील मध्य प्रदेशातील तसंच गुजरातमधून सुद्धा जवळपास एक हजाराच्या वर दिंड्यासह लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहेत.

संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोमवारी विदर्भात उत्साहात साजरा झाला. शेगावप्रमाणेच नागपुरातही अनेक ठिकाणी प्रगटदिनाच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली. या निमित्ताने रेशीमबाग, अंबाझरी, त्रिमूर्तीनगर, महाल येथील गजानन मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अनेक देवस्थानांमध्ये प्रगटदिनाच्या निमित्ताने आठवडाभर उत्सव चालणार आहे. काही देवस्थानांनी गजान विजय पोथीच्या सामुहिक पारायणांचे आयोजन केले होते. शेगावमध्ये प्रगटदिनाच्या निमित्ताने मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असून प्रगटदिनाच्या निमित्ताने दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होते.