लिट्टेचा म्होरक्या व्ही. प्रभाकरन जिवंत असल्याचा तमीळ नेत्याचा दावा

0

चेन्नईः एलटीटीई म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या श्रीलंकेतील संघटनेचा प्रमुख व्ही. प्रभाकरन हा जीवंत असल्याचा दावा वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ तामिळचे अध्यक्ष पी. नेदुमारन यांनी तमिळनाडूच्या (LTTE Leader V. Prabhakaran) तंजावरमध्ये एक निवेदन जारी करून हा दावा केला आहे. प्रभाकरन योग्यवेळी जगापुढे येईल असा दावा करताना प्रभाकर हा सध्या त्याच्या कुटुंबासोबत असून तो स्वस्थ असल्याचा दावाही करण्यात आला. योग्य वेळ आल्यावर प्रभाकरन जगासमोर येईल, असे नेदुमारन यांनी म्हटले आहे. श्रीलंकेच्या ​​लष्कराच्या लष्करी कारवाईत २००९ मध्ये प्रभाकरन ठार झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध आहे. मात्र, आता प्रभाकरनबाबत करण्यात आलेल्या या नव्या दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे.
नेदूमारन यांनी सांगितले की, व्ही. प्रभाकरन लवकरच तामिळवंशाच्या मुक्तीसाठी योजना जाहीर करणार आहे. जगातील सर्व तामीळ जनतेने संघटित होऊन त्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केलेय. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या श्रीपेरांबुद्दूर येथे झालेल्या भीषण हत्येत प्रभाकरन याचा सहभाग होता. श्रीलंकेच्या लष्कराने लिट्टेचा नायनाट केला असून कारवाईत प्रभाकरनही ठार झाल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे त्याचा मृतदेह देखील श्रीलंकन लष्कराच्या हाती लागला होता.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा