नागपूरः(nagpur) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष(nana patole) नाना पटोले यांना सत्ताधाऱ्यांकडून महिन्याला एक खोका मिळत असावा. ते नवीन सरकारच्या प्रमुखांबद्धल कधीच काही बोलताना दिसत नाहीत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आशीष देशमुख यांनी केला (Congress Leader Ashish Deshmukh allegations against Nana Patole) आहे. यासंदर्भात बोलताना देशमुख म्हणाले की, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपमुख्यमंत्री आणि (bjp)भाजपाच्या विरोधात बोलताना सातत्याने दिसतात. याच्यामागे ‘ते खोके’ कारणीभूत आहेत का? अशी चर्चा मुंबईत केली जात आहे. योग्य वेळी याचे योग्य ते पुरावे देईन, असेही देशमुख म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेला नाना पटोले गैरहजर राहिले, याकडे लक्ष वेधले असता देशमुख यांनी हे आरोप केलेत.
एका वाहिनीशी बोलताना( Ashish Deshmukh ) आशीष देशमुख म्हणाले की, नाना पटोले हे ‘वज्रमूठ’ सभेत गैरहजर होते. आपण ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रदेशाध्यक्ष (surat)सूरतच्या मार्गावर होते. सूरतच्या मार्गावर कोण असते, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. १६ तारखेला महाविकास आघाडीची नागपूरला सभा आहे. तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष गुवाहाटीला बघायला मिळतील, असा टोलाही त्यांनी हाणला. मी अतिशय जबाबदारीने हे वक्तव्य करतोय्, असा दावाही देशमुख यांनी केला आहे. नागपूरला १६ तारखेला महाविकास आघाडीची सभा होत आहे. त्याची कोणतीही जबाबदारी प्रदेशाध्यक्षांनी घेतलेली नाही. आमच्या दुसऱ्या नेत्यांवर त्याची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे संभाजीनगरच्या सभेत सूरतच्या मार्गावर असलेले प्रदेशाध्यक्ष १६ तारखेपर्यंत गुवाहाटीच्या मार्गावर असलेले दिसतील, असेही ते म्हणाले.