
नागपूर : पाकिस्तानमधील एका व्यक्तीशी संशयास्पद व्हाट्सअप चॅटिंग करताना आढळल्यावरून नागपुरातील सतरंजीपुरा,हंसापुरी परिसरात एनआयने धाडसत्र आरंभिल्याने खळबळ माजली. नागपूर हे संवेदनशील शहर असल्याने याकडे गांभीर्याने बघितले जात आहे. आज गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास स्थानिक लकडगंज पोलिसांच्या सहकार्याने सुरू झालेली ही कारवाई बराच वेळ पर्यंत सुरू होती. घटनास्थळी गर्दीही जमली.मात्र, याविषयीचा अधिक तपशील देण्यास एनआयए अथवा स्थानिक पोलिसांनी नकार दिला. 2017 सालचे हे प्रकरण असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. यावेळी कुराणमध्ये सांगितल्याप्रमाणे विशिष्ट शिक्षणासंबंधी चौकशी करण्यासाठी त्या युवकाने हे फोन कॉल व्हाट्सअप चॅटिंग केले होते. त्यावेळी तो 17 वर्षाचा होता अशी माहिती पुढे आली .आज यासंदर्भात पोलिसांनी संबंधित दोघांची चौकशी केली असली तरी कोणालाही अटक केली नाही किंवा ताब्यात घेतले नाही.
नोटीस बजावल्यानंतर संबंधीतांकडून मोबाईल सोबत नेल्याचे सांगण्यात आले.