चोरच आडनाव मोदीच का? काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं हे विधान त्यांना भोवलं आहे. 2019 मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सूरत कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.तसेच त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित होते.
वृत्त संस्थाच्या माहिती नुसार, राहुल गांधीनी कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडनावावरून टीका केला होती. राहुल गांधीविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यासंदर्भात सूरतच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर त्यांना दोन वर्षाची शिक्ष सुनावण्यात आली. राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला. राहुल गांधीचा जामीन मंजूर झाला आहे.
2019 मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सूरत कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. मोदी आडनावावरून टीका केली होती.
काय आहे प्रकरण?
2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटकात राहुल गांधींनी हे विधान केलं होतं. त्यांच्याविरोधात भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी भादंवि अंतर्गत मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यावर सूरच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधींविरोधात निकाल देत त्यांना दोषी ठरवलं आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावली.