वेडमपल्लीच्या जंगलात पोलिस-नक्षल चकमक

0

नक्षल्यांचा घातपाताचा डाव पोलिसांनी उधळला

गडचिरोली. भूमकाल सप्ताहाच्या (Bhumkal week) पार्श्वभूमीवर नक्षली मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत होते (Naxalites were preparing to carry out a major attack). मात्र, गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाने नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला (special team of Gadchiroli police foiled the assassination attempt of Naxalites). नक्षलविरोधी अभियानादरम्यान अहेरी तालुक्यातील पेरमीली हद्दीत येणाऱ्या वेडमपल्ली परिसरात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. रविवारी अहेरी तालुक्यातील वेडमपल्ली जंगल परिसरात दुपारी २ वाजताच्या सुमारास नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दडून असलेल्या जवळपास २० ते २५ नक्षल्यांनी पोलिसांच्या विशेष पथकावर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी देखील गोळीबार केला. दरम्यान पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. यावेळी चकमकस्थळी १ पिस्तुल,१ भरमार बंदूक,१ वॉकीटॉकी चार्जरसह मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य आढळून आले. भूमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दुपारी २ वाजताच्या दरम्यान सदर जंगल परिसरात २० ते २५ च्या संख्येतील नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांच्या दिशेने गोळीबार केला. विशेष अभियान पथकाच्या जवानांनी सावध पवित्रा घेत प्रतिउत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला.भूमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपाताची नक्षलवाद्यांची योजना होती, पण, गडचिरोली पोलिस दलाच्या जवानांनी ती हाणून पाडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता १ भरमार, १ पिस्टल, १ वॉकीटॉकी चार्जर आणि इतर नक्षल साहित्य पोलिसांच्या हाती लागले. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख यांच्या देखरेखीखाली पार पडली.विशेष अभियान पथकाच्या जवानांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक करत त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहे.

राजस्थानी घेवर आणि मक्के की ढोकळी : | Shankhnaad Khadya Yatra Ep.no 73