राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अवमान करणारी पोस्ट, निषेध

0

वर्धा : मिलिंद फुलझले नामक व्यक्तीने वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विषयी एकेरी भाषेत, आक्षेपार्ह विधान फेसबुक या सोशल मीडियावर केलेले आहे. या संदर्भात अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.

सदर मिलिंद फुलझले नामक व्यक्तीने राष्ट्रसंत तूकडोजी महाराज यांचा एकेरी भाषेत उल्लेख करीत सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराजांचा अपमान केल्याने लाखो गुरुदेव प्रेमींच्या भावनांना ठेच पोहोचल्याचेअखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ सदस्य कैलास बाळबुधे यांनी म्हटले आहे.