पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन

0

नवी दिल्ली: भारतीय लोकशाहीचे मंदिर असा गौरव होणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. नव्या संसद भवनाचे उद्घाटन वैदिक विधींनुसार झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत सेंगोलची स्थापना केली. यानंतर नव्या संसदेत सर्व धर्मीयांकडून प्रार्थना करण्यात आली. या माध्यमातून सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला. नवी संसद ही वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. नव्या संसद भवनाच्या उभारणीसाठी तब्बल ८६२ कोटी रुपये खर्च झाले आहेत.