अमरावती – किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणानंतर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले गेले. आज अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर येथे ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राचे कलंक अश्या आशयाचे बॅनर झळकले. यावेळी सोमय्यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध करण्यात आला. दरम्यान, सरकार विरोधी घोषणाबाजी देखील करण्यात आली. अचानक झालेल्या आंदोलनाने अमरावती यवतमाळ रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. यावेळी सरकारने किरीट सोमय्यांवर कारवाई न केल्यास किरीट सोमय्यांच्या घरावर हल्लाबोल आंदोलन करणार असल्याचा इशारा ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांनी दिला.