पुणे- पुण्यातील कसबा पेठ लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच लागणार असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar on Pune Lok Sabha) यांनी केला आहे. भाजपचे नेते व माजी खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. अजित पवार म्हणाले, मला वाटत होते की लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिले असल्याने पोटनिवडणूक लागणार नाही. मात्र, या जागेसाठी पोटनिवडणूक लागणार असल्याची आपली आतल्या गोटातील माहिती आहे, असेही पवार यांनी सांगिले. विशेष म्हणजे काँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार असल्याचे वक्तव्य केले आहे. तर राष्ट्रवादीने देखील पुणे लोकसभा लढविण्याची तयारी केलेली आहे. भाजपमध्ये या जागेसाठी अनेक दावेदार तयार झाले असून किमान दोन उमेदवारांच्या समर्थकांनी भावी खासदार म्हणून बॅनरबाजीही केली आहे.
दरम्यान, लोकसभेची निवडणूक पुढील एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. त्यामुळे पोटनिवडणूक होणार की नाही, याबद्धल संभ्रमाचे वातावरण आहे.