आज दि. 24 जुलै 2023 ला हिगणा येथे जिल्हा शाखेची त्रैमासीक सभा मा . साहेबराव ठाकरे सर जि संपर्क प्रमुख यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाली व्यासपीठावर जिल्हा शाखेचे सर्व वरीष्ठ पदाधिकारी उपस्थित होते . कार्यक्रम पत्रीके प्रमाणे जि सरचिटणीस दिपक सावळकर यांनी सर्व विषय सभेसमोर मांडले . सर्व विषयावर चर्चा होउन सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले . संघटनेने गेली चार पाच महिने वेगवगळे आंदोलने करूनही शासनाकडून उपदान . अंशराशी करण . गटविमा अनुदान न पाठविल्या मुळे शासनाचा निषेध करण्यात आला . व पूढील महीण्यात जिल्हा स्तरावर साखळी उपोषण करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला . या आंदोलना स सर्व पिडीतांनी सहकार्य करण्याचे सर्प तालूका शाखां नी मान्य केले . सभेला अजाबराव कोल्हे . रामदास किटे . विनोद राउत . साहेबराव ठाकरे . प्रकाश वैरागडे . गाढवे सर . रमेश कापसे . सरिता किंमत कर संजय भेंडे . यांनी मार्गदर्शन केले . त्यानंतर हिंगणा नगराध्यक्ष लताताई गौतम व भीमराव बेले जयश्री कावळे शेषराव खंडार . अॅड बोकडे यांचे हस्ते हिंगणा शाखेतर्फे भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवा निमित्त अमृत वर्षात प्रवेश करणाऱ्या हिंगणा पस मधील से. नि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला . संचलन चौधरी मॅडम व रामभाउ ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन कल्पना दुरुगकर यांनी केले . पसायदाना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली त्यांनी सर्वांनी सहभोजना चा आस्वाद घेतला .