जालंधर (jalndhar) : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांची भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) सध्या पंजाबमध्ये प्रवास करीत असून पंजाबमधील प्रवासात त्यांच्या सुरक्षेत दोनदा चूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. पंजाबच्या होशियारपूरमध्ये तरुणाने धावत येऊन (Rahul Gandhi`s Security) त्यांना जबरदस्तीने मिठी मारल्याचा प्रकार घडला तर एक संशयित अगदी त्यांच्या जवळ जाऊन पोहोचला होता. तरुणाने राहुल गांधी यांना मिठी मारली तेव्हा त्यांनी एका नेत्याच्या मदतीने त्याला दूर ढकलले. ही बाब सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तरुणाला ताब्यात घेण्यात घेतले.तर बस्सी गावात चहापान सुरु असताना डोक्याला भगवा कपडा बांधून एक तरुण राहुल यांच्या जवळ पोहोचला होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून ताब्यात घेतले. राहुल गांधी यांना सध्या तीनस्तरीय सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे.
पंजाब हे अतिशय संवेदनशील राज्य मानले जाते. या परिस्थितीत राहुल गांधींना पंजाबमध्ये जास्तीत जास्त सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांना तीनस्तरीय सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. सुरुवातीला पंजाब पोलिसांचा सुरक्षा सर्कल, त्यानंतर पंजाब पोलिस आणि राज्य सीआयडीचा सुरक्षा सर्कल आणि नंतर राहुल गांधींची सुरक्षा आहे.
दरम्यान, यापूर्वी राहुल गांधी यांच्या सुरक्षेवरून वाद झाला आहे. राहुल गांधी यांच्याकडून वारंवार सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन झाले असल्याचा आरोप सीआरपीएफकडून करण्यात आला आहे. २०२० पासून त्यांनी तब्बल ११३ वेळा सुरक्षा विषय नियमांचे उल्लंघन केले, असा आरोप करण्यात आला आहे.
Shankhnaad News |राजस्थानी घेवर आणि मक्के की ढोकळी : | Shankhnaad Khadya Yatra Ep.no 73