अमरावती : सध्या विदर्भात उष्णतेची लाट असल्याने मान्सून केव्हा दाखल होणार याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.पाऊसच नसल्याने अमरावती जिल्ह्यात एकही टक्के पेरण्या झाल्या नाहीत. 22 जून ते 1 जुलै पर्यंत विदर्भात मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती अमरावतीचे हवामान तज्ञ अनिल बंड यांनी दिली. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेती तयार ठेवावी व जूनच्या अगदी शेवटी किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी असे आवाहन हवामान खात्याने केलं आहे.