वर्धा ते नांदेड धावणार रेल्वे, खासदार रामदास तडस यांनी केली पाहणी

0

 

वर्धा- खासदार रामदास तडस यांनी वर्धा ते नांदेड लवकरच सुरू होणाऱ्या रेल्वे महामार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली. पहिल्या टप्प्यात ही रेल्वे वर्धा ते कलंब आणि वर्धा ते देवळी धावणार असल्याचे सांगितले. देवळी या गावामध्ये रेल्वे प्रथमच येणार असल्याने ही रेल्वे जनसामान्यांकरिता अधिकच सोयीस्कर होणार असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांच्या समवेत भाजपा जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट, वर्धा विधान परिषद आमदार डॉ रामदास आंबटकर, जिल्हा उपाध्यक्ष जयंत कावळे उपस्थित होते. यावेळी त्यांनी रेल्वेच्या कामाची पाहणी केलेली आहे लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा अधिकाऱ्यांना दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच जिल्ह्यातील विविध विकास कार्य सुरू असल्याचे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.