लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची राजू शेट्टींची घोषणा

0

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीला अद्याप एक वर्ष शिल्लक असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केलीय. हातकणंगलेसह लोकसभेचे पाच ते सहा मतदारसंघ लढविणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. मागील निवडणुकीत राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढविली होती व त्यांना पराभवाचा समाना करावा लागला होता. आता त्याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
दरम्यान, लोकसभा मतदारसंघातील निवडणुका लढविण्याबाबत लवकरच उमेदवारांची यादीही जाहीर करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले आहे. आंबा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रशिक्षण मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला. राजू शेट्टींनी निवडणूक लढण्याबाबत स्वतः प्रतिक्रिया देत हा निर्णय जाहीर केला आहे. राजू शेट्टी यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या चिंता वाढल्या आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा