
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग 8 मे पासून रेशीमबागमधील स्मृती मंदिर परिसरात सुरु होत आहे. या वर्गात देशभरातील विविध प्रांतांमधून शिक्षार्थी स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. ८ मे रोजी सकाळी डॉ.हेडगेवार स्मृति भवन (Dr. Hedgewar Smriti Bhavan) परिसरातील महर्षि व्यास सभागृहात या वर्गाचे उद्घाटन सत्र होणार आहे. यंदा अवध प्रांताचे संघचालक कृष्णमोहन हे या वर्गाचे सर्वाधिकारी असणार आहेत. या वर्गासाठी कृष्णमोहन यांचे नागपुरात आगमन झाले असून नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, सहकार्यवाह उदय वानखेडे, मोहिते भागाचे सह कार्यवाह रवी लांजेवार यांनी त्यांचे रेल्वे स्थानकावर स्वागत केले.