अडकलेला मांजा काढा, अनर्थ टाळा – मनपाचे नागरिकांना आवाहन .

0

नागपूर : शहरात मकरसक्रांतीनिमित्त पतंग उडविण्यात आल्या, यादरम्यान शहरातील झाडे, इमारती, विद्युत खांब, विद्युत तारेवर मांजा अडकलेला असतो. हा मांजा पक्ष्यांसाठी तसेच व्यक्तींसाठी घातक ठरू शकतो. मांजात अडकून कुठलाही अनर्थ होऊ शकतो, हाच अनर्थ टाळण्यासाठी, झाडे, इमारती, विद्युत खांब, विद्युत तारेवर अडकलेला मांजा काढण्यासाठी शहरातील नागरिक तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे करण्यात आले आहे.
आपल्या सोसायटी मधील बिल्डीग, इमारतीच्या छतावर तसेच परिसरातील झाडे/ झुडपे इत्यादीवर अडकून असलेला मांजा शक्य असल्यास काढून मनपास योग्य विलहेवाटी करीता सुपूर्द करावा. तसेच शक्य नसल्यास त्याबाबत माहिती मनपा क्षेत्रिय कार्यालय व मनपा व्हॉटसॲप क्रमांक 8600004746 यावर संपर्क साधून मांजाबाबत माहिती देण्यात यावी. असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक तथा उपायुक्त श्री. डॉ. गजेंद्र महल्ले यांनी नागरिकांना केले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा