नागपूर : कोव्हिड प्रतिबंधात्मक कोव्हिशिल्ड लसीकरणासाठी मनपाच्या दहाही झोनमधील १५ केंद्रांवर गुरूवार १९ जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार आहे. अद्यावही कोव्हिड प्रतिबंधात्मक कोव्हिशिल्ड लसीकरणाचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस न घेतलेल्या व्यक्तींनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाउन लसीकरण करून घेण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गापासून बचावाचे मोठे अस्त्र कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे नागपूर शहरातील प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी लसीकरणाचे अभियान चालविण्यात आले होते. त्याचेच फलीत म्हणजे शहरात पात्र व्यक्तींच्या संख्येपेक्षा अधिक जणांचे पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले. दुस-या डोससाठी काही नागरिकांचे लसीकरण अद्यापही बाकी आहे. याशिवाय दोन डोस घेतल्यानंतर सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झालेल्या व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात येतो.
सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत लसीकरणाची वेळ असून
लसीकरण केंद्र पुढीलप्रमाणे आहेत.
१ लक्ष्मीनगर खामला प्राथ. आरोग्य केंद्र पांडे लेआउट खामला
२ धरमपेठ इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर
३ धरमपेठ के.टी. नगर यूपीएचसी के.टी. नगर, उत्कर्ष नगर जवळ, काटोल रोड
४ हनुमान नगर सोमवारी क्वार्टर गजानन मंदिराच्या बाजूला सोमवारी पेठ
५ धंतोली एम्स हॉस्पीटल मिहान
६ धंतोली आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा
७ धंतोली बाबुळखेडा यूपीएचसी मानवता शाळा समोर, रामेश्वरी रोड बाबुळखेडा
८ नेहरू नगर नंदनवन यूपीएचसी दर्शन कॉलनी नंदनवन
९ नेहरू नगर दिघोरी यूपीएचसी जिजामाता नगर, दिघोरी
१० गांधीबाग स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र कोतवाली पोलिस चौकीजवळ, महाल
११ सतरंजीपुरा मेहंदीबाग यूपीएचसी देवतारे चौक, मेहंदीबाग
१२ लकडगंज हिवरीनगर यूपीएचसी हिवरीनगर पॉवर हाउस जवळ
१३ आशीनगर मनपा स्त्री रुग्णालय पाचपावली
१४ मंगळवारी इंदोरा यूपीएचसी बेझनबाग मैदान, इंदोरा
१५ मंगळवारी झिंगाबाई टाकळी यूपीएचसी झिंगाबाई टाकळी झेंडा चौक जवळ