नवी दिल्ली: भारतासाठी मोस्ट वाँटेड असलेल्या दाऊद इब्राहिमसंबंधीची महत्वाची माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे. पाकिस्तानात कराची परिसरात आश्रयाला असलेला दाऊदच्या टोळीचे (D Company) कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Karachi International Airport) वर्चस्व असल्याचे आढळून आले आहे. कुख्यातसलीम फ्रूट याची पत्नी शाझिया हिच्या चौकशीतून ही माहिती पुढे आलीय. छोटा शकीलच्या मुलींच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी सलीम फ्रूटचे कुटुंब बेकायदेशीरपणे पाकिस्तानात गेले होते. त्यात सलीम फ्रूटही छोटा शकीलला भेटण्यासाठी आणि त्याच्या मुली झोया आणि अनमच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी पोहोचला होता, अशी माहिती शाझिया हिने एनआयएकडून झालेल्या चौकशीत दिल्याचे सांगण्यात येत आहे.
एनआयए सातत्याने डी कंपनीच्या मागावर आहे. डी-कंपनीच्या सिंडिकेट आणि टेरर फंडिंगची चौकशीही एनआयएकडून सुरु आहे. शाझियाने सांगितले की, कराची विमानतळ डी-कंपनीच्या ताब्यात आहे. दाऊद इब्राहिम आणि डी-कंपनीसोबत व्यवसाय करण्यासाठी कराचीत दाखल होणाऱ्या लोकांच्या पासपोर्टवर विमानतळावर शिक्के लावले जात नाहीत. त्यांना भेटणासाठी आलेल्या पाहुण्यांना कराची विमानतळाच्या आतील व्हीआयपी लाऊंजमधून आणले जाते. त्यांना दाऊद इब्राहिम किंवा छोटा शकीलच्या घरी नेण्यासाठी प्रचंड गुप्तता बाळगली जाते. दाऊद इब्राहिम किंवा छोटा शकील यांना भेटण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये पोहोचण्याचा हा अवैध मार्ग आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
कुख्यात दाऊद व त्याचे कुटुंबीय कराची परिसरात पाकिस्तानी लष्कराच्या संरक्षणाखाली वास्तव्याला आहे. पाकिस्तानने आजवर दाऊदच्या पाकिस्तानातील वास्तव्याची कबुली दिलेली नाही. दारुदच्या पाकिस्तानातील वास्तव्याबाबत सातत्याने भारतीय तपास यंत्रणांना पुरावे मिळत आहेत.
कराची विमानतळावर दाऊदच्या डी कंपनीचेच वर्चस्व, एनआयएच्या तपासात माहिती उघड
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा