कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत ‘रन फॉर लेप्रसी’

0

नागपूर : कुष्ठरोग आणि क्षयरोगाच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात ‘स्पर्श कुष्ठरोग आणि क्षयरोग जनजागृती अभियान’ ( ‘Touch Leprosy and Tuberculosis Awareness Campaign’ ) राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत सहाय्यक संचालक आरोग्य (कुष्ठरोग) सेवा यांच्या तर्फे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कुष्ठरोग निवारण दिनानिमीत्त मॅरॉथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार ता. (३०) रोजी सकाळी 7 वाजता फ्रीडम पार्क येथून मॅरॉथॉन सुरू होईल. १५ ते १८, १९ ते ३५ आणि ३६ वर्षाहून अधिक अशा तीन गटात मॅरॉथॉन स्पर्धा होईल. मॅरॉथॉन स्पर्धेत नागपूर महानगरपालिकेतील सर्व विभाग प्रमुख सहभागी होतील.
मॅरेथॉन फ्रीडम पार्क झिरो माईल येथून सुरू होऊन, मेट्रो स्टेशन, संविधान चौक, आकाशवाणी चौक, विद्यापीठ चौक मार्गे येऊन फ्रीडम पार्क )(Marathon starts from Freedom Park Zero Mile, passes through Metro Station, Constituent Chowk, Akashvani Chowk, Vidyapeeth Chowk and reaches Freedom Park. )

येथे समाप्त होईल. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणी विनामुल्य करण्यात येणार आहे. मॅरेथॉनसाठी सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना टी शर्ट वाटप केले जाईल. टीशर्ट साठी २७ ते २९ जानेवारी दरम्यान, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), दीक्षाभूमीजवळ, नागपूर येथे सायंकाळी पाचपर्यंत संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

फेनल अँड पेपर चिकन आणि चिकन टिक्का| EP.NO,78 | Pepper chicken recipe | chicken tikka recipe |