नागपूरः लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकांवर करण्यात आलेल्या सी व्होटरच्या सर्वेक्षणावर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया सुरुच असून शरद पवार यांनी या सर्वेक्षणावर प्रतिक्रिया दिल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी (BJP State President Chandrashekhar Bawankule) त्याला उत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील जनमत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दिसत असल्याची प्रतिक्रिया पवारांनी व्यक्त केल्यावर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात रालोआ ४५ पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा केला. बावनकुळे म्हणाले की, सी व्होटरचा सर्व्हे हा काही १३ कोटी जनतेचा सर्व्हे नाही. काही मर्यादित सँपल घेऊन हा सर्व्हे केला जातो. त्यामुळे त्या आधारे लोकसभा निवडणुकीचे भवितव्य सांगणे कठीण आहे. या सर्व्हेवर कोणी आनंद किंवा दिवाळी साजरी करीत असेल तर त्यांनी करावी. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात पक्षसंघटना आणखी मजबूत करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. सर्वांना सोबत घेऊन आम्ही ५१ टक्के मतांची आकडेवारी निश्चितपणे गाठणार आहोत. रालोआला ४५ पेक्षा अधिक जागा निश्चितपण मिळतील, असे बावनकुळे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे नेहमीच सत्ताधाऱ्यांसाची चिंतेची बाब सांगत असतात. ग्राम पंचायत निवडणुकीच्या वेळीही त्यांनी असे सांगितले होते. मात्र, पंतप्रधान मोदींवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही दाव्याने सांगतो की आम्हाला ४५ च्या वर जागा मिळतील, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी सी व्होटरच्या सर्व्हेवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही महाराष्ट्रातील आकडेवारी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्याचे सांगितले. सर्व्हे करणार्या संस्थेची सत्यता यापूर्वीही स्पष्ट झालेली आहे. पण, मी त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणार नसून या सर्व्हेने दिशा मात्र दाखविली आहे व ती दिशा सत्ताधाऱ्यांसाठी सोयीची नाही. कर्नाटकचा सर्व्हे वेगळा आहे. तेथे भाजपचे सरकार राहणार नाही. पण उत्तर प्रदेश सर्वात मोठा भाग आहे. तेथील ठराविक माहिती आमच्याकडे नाही, असे पवार म्हणाल होते.
फेनल अँड पेपर चिकन आणि चिकन टिक्का| EP.NO,78 | Pepper chicken recipe | chicken tikka recipe |