आमदार नितीन देशमुख यांच्या अडचणीत वाढ

0

एसीबीचे तहसीलदारांना पत्र : नातेवाईकांच्याही मालमत्ता तपासण्याची सूचना
अमरावती. बेहिशेबी मालमत्तांच्या आरोपांनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शिवसेना ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh ) यांची चौकशी सुरू केली आहे. आमदार देशमुख यांच्यासह नातेवाईकांच्याही मालमत्ता तपासण्याचे (Order to check property of relatives also) तसेच त्यांच्या नावे असलेले भूखंड, शेती, जमीन आदी स्थावर मालमत्तेची कागदपत्रे प्रमाणित सत्यप्रत पाठविण्याबाबतचे पत्र एसीबीने पातूर तहसीलदारांना दिले आहे. यामुळे आमदार देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार आहे. आमदार देखमुख यांनी मात्र आपण कुणालाही घाबरत नाही, सर्वप्रकारच्या चौकशीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. आमदार देखमुख हे प्रारंभी शिंदे गटासोबत गुजरातला गेले होते. नंतर मात्र ते परतले आणि ठाकरे गटात सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर गंभीर आरोपही केले होते.

एसीबीने आमदार नितीन देशमुख यांच्या मालमत्तेची उघड चौकशी सुरू केली आहे. आमदार देशमुख यांना १७ जानेवारी रोजी एसीबीच्या अमरावतीच्या विभागीय कार्यालयात बयाण नोंदविण्यासाठी बोलविण्यात आले होते. आता एसीबी देशमुखांच्या मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचा शोध घेत त्याची कागदपत्रे अमरावतीला सादर करण्यासंदर्भात एसीबीने अकोला जिल्ह्यातील पातूरच्या तहसीलदारांना पत्र लिहिले आहे.

आमदार नितीन देशमुख यांचे मूळ गाव पातूर तालुक्यातील सस्ती आहे. अमरावतीच्या विभागीय कार्यालयाने पातूरच्या तहसीलदारांना संपत्तीच्या व्यवहारांच्या खरेदी-विक्रीची माहिती मागितली आहे. आमदार नितीन देशमुख यांचे भाऊ, बहिण, आई, पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावाने संपत्ती घेतली असल्यास ते शोधण्याचे दिले आदेश पातूर तहसीलदारांना देण्यात आले आहे. त्यामुळे पातूर तहसीलदारांना आमदार देशमुखांसह नातेवाईकांच्या स्थावर मालमत्तेची उघड चौकशी करावी लागणार आहे.

कारवाईचा ससेमीरा मागे लागल्यानंतर आमदार देखमुख यांनी बोलकी प्रतिक्रीया दिली आहे. अमरावती एसीबीने पातूर तहसीलदारांमार्फत नातेवाईकांच्या स्थावर मालमत्तेबाबत माहिती मागविली आहे. निश्चित चौकशी व्हावी. तहसीलदार यासंदर्भात चौकशी करतील. माझ्याकडे मुंबईत बंगला आहे, असे म्हणने आहे. मी तर म्हणतो, एसीबीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना माझ्या संपत्तीबाबत चौकशीचे तपास करण्याचे आदेश द्यावे, या शब्दात त्यांनी सत्ताधारी शिंदे गटावरच निशाणा साधला आहे.

 

फेनल अँड पेपर चिकन आणि चिकन टिक्का| EP.NO,78 | Pepper chicken recipe | chicken tikka recipe |

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा