ट्रॅव्हल्स उलटून एक ठार, 12 जण जखमी

0

राजुरा तालुक्यात अपघात : सिरोंचातील अपघातातही एक ठार
चंद्रपूर/ गडचिरोली. राजुरा आणि सिरोंचा (Rajura and Sironcha ) तालुक्यातीनून भीषण अपघातांच्या घटना पुढे येत आहेत. दोन्ही ठिकाणी प्रवासी वाहनांना अपघात (Accidents to passenger vehicles ) झाला. मजुरांना घेऊन जाणारी खासगी ट्रॅव्हल्स उलटून (Private travels reversed ) १ जण ठार तर १२ जण जखमी झाले. ही घटना राजुरा तालुक्यातील वरूर ते धानोरा मार्गावर घडली. याचप्रमाणे सिरोंचा तालुक्यात उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीर प्रवासी वाहन धडकून एक जण ठार तर चौघे जखमी झाले. सिरोंचापासून ९ किमी अंतरावरील लांबडपल्ली गावाजवळ ही घटना घडली. दोन्ही अपघात सकाळच्या सुमारास घडले. डोळ्यात झोप असतानाही चालकांनी वाहन चालविण्याचे धाडस केल्याने या घटना घडल्या असल्याचे सांगितले जात आहे. जखमींवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

छत्तीसगड राज्यातून बेमेत्रा जिल्ह्यातील नावागळ येथून हैदराबादला ३७ मजूरांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स आज पहाटे राजुरा तालुक्यातील वरूर ते धानोरा मार्गावर उलटली. या अपघातात १जण ठार तर १२ जण गंभीर जखमी झाले. अन्य मजूर किरकोळ जखमी झाले. जखमींना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले आहे.
सिरोंचातील जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचाररस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला टाटा मॅजिक या प्रवासी वाहनाने जोरदार धडक दिल्याने एक जण ठार तर चौघे गंभीर जखमी झाले. हा अपघात सिरोंचापासून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या लांबडपल्ली या गावाजवळ शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास झाला. जखमी झालेल्या ४ इसमांना उपचारासाठी सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालय हलविण्यात आले. सदर गाडी सोमनूरची असल्याचे सांगितले जात आहे. सिरोंचा ते असरअल्ली महामार्गाचे काम काही दिवसांपासून बंद आहे. परंतु, कामावर चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली बेजबाबदारपणे रस्त्यावर उभ्या करून ठेवतात. रस्त्याचे डांबरीकरण अर्धवट करून सोडून दिलेले आहे. यातच वेगाने येत असलेल्या टाटा मॅजिकला उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज आला नाही आणि हा अपघात झाला. यात धडक देणाऱ्या वाहनाचा समोरील भाग चेंदामेंदा झाला आहे.

 

फेनल अँड पेपर चिकन आणि चिकन टिक्का| EP.NO,78 | Pepper chicken recipe | chicken tikka recipe |