Home MAHARASHTRA संभाजीनगर, धाराशिवच्या नामांतराची कार्यवाही पूर्ण

संभाजीनगर, धाराशिवच्या नामांतराची कार्यवाही पूर्ण

0

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने निर्णय घेतल्यावर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांच्या नामांतराची कार्यवाही शनिवारी पूर्ण झाल्याची अधिसूचना राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आली असून मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास वर्षभरापूर्वीच राज्य सरकारने यासंदर्भात निर्णय केला होता. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया आणि अधिसूचना काढताना झालेल्या चुकांमुळे केवळ शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले. मात्र, जिल्हा व विभागाचे नाव पूर्वीचे औरंगाबाद असेच राहिले होते. या नव्या अधिसूचनेमुळे जिल्हा व विभागाचे नाव देखील छत्रपती संभाजीनगर करण्यात असून तीच प्रक्रिया धाराशिव बाबतही राबविण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्ह्यांची नावे बदलण्याची मागणी केली जात होती. त्यासाठी शिवेसना आणि भाजपच्या वतीने अनेकदा आंदोलने देखील करण्यात आली होती. त्यात नंतरच्या काळात मनसेची देखील भर पडली. मात्र, एमआयएम आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी या नामांतराला विरोध केला होता. त्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ यांच्या मंत्रिमंडळाने या शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता.