मुंबई: कार्डिलिया क्रुझवरील कथित ड्रग्ज प्रकरणाच्या संशयावरून अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली (Cbi action against Sameer Wankhede) होती. या प्रकरणाच्या तपासात सीबीआयला धक्कादायक माहिती मिळाली आहे. आर्यन खानच्या प्रकरणात एनसीबीचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांनी खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
समीर वानखेडे आणि त्यांचे अन्य तीन सहकारी यांचा आर्यन खानकडून तब्बल २५ कोटींची खंडणी घेण्याचा डाव होता. अशी माहिती समोर आली आहे.
सीबीआयने काल समीर वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अनेक ठिकाणी छापे घातले.
या कारवाईत अनेक महत्वाचे दस्तावेज हाती लागले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सीबीआयच्या माहितीनुसार, समीर वानखेडे आणि त्यांचे अन्य तीन सहकारी यांचा आर्यन खानकडून तब्बल २५ कोटींची खंडणी घेण्याचा डाव होता. आर्यन खानला त्या प्रकरणातून सोडविण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खंडणी घेण्याचा डाव होता, अशी माहिती पुढे आली आहे.
त्यामुळे वानखेडे आणि त्यांचे अन्य सहकारी यांच्यापुढील प्रश्न आणखी गंभीर होणार असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयआरएस अधिकारी असलेले वानखेडे हे चेन्नईमध्ये कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी शाहरुखच्या कुटूंबियांकडून ५० लाख रुपये आगाऊ रक्कम घेतल्याचे समोर आले आहे. सीबीआयनं आतापर्यत वेगवेगळ्या २९ ठिकाणांचा शोध घेतला असून त्यामध्ये मुंबई, दिल्ली, रांची, लखनौ, गुवाहाटी या ठिकाणांचा समावेश आहे. याठिकाणांहून त्यांनी वेगवेगळी कागदपत्रं, रोख रक्कम आणखी काही वस्तू जप्त केल्या आहेत.