सर्वसामान्यांचे, वैदर्भीय प्रश्न सुटावे हाच मानस- संदीप जोशी

0

(Nagpur)- ‘ देवगिरी‘ उपमुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयात रोज नागरिकांची गर्दी नागपूर- सर्वसामान्यांचे विदर्भातील प्रश्न सुटावे या एकमेव उद्देशाने देवगिरी कार्यालयात (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत हे जनसंपर्क कार्यालय सुरू केले. बहुतांशी प्रश्न यातून नक्कीच मार्गी लागतील असा विश्वास उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष मानद सचिव माजी माजी महापौर (Sandip Joshi) संदीप जोशी यांनी ‘शंखनाद’ न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केला.
जोशी म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वैदर्भीय जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. याच आकांक्षा, आशेपोटी बुलढाणा ते गडचिरोली अशा संपूर्ण विदर्भातून मोठ्या प्रमाणात नागरिक आपली समस्या, निवेदन घेऊन या कार्यालयात येत आहेत. मुख्यत्वे संबंधित विभागांना पत्र पाठविल्यानंतर याविषयीचा फॉलोअप अतिशय महत्त्वाचा असतो. हाच पाठपुरावा करण्याचे काम या कार्यालयामार्फत आम्ही करीत आहोत आणि त्याचे चांगले परिणाम देखील दिसू लागले आहेत. एक मात्र निश्चित की अनेक गोष्टी अशा जटील आहेत ज्या वीस वर्षे सुटलेल्या नाहीत त्या सोडवितांना नक्कीच काहीसा विलंब होणार आहे. यासाठी जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे या वास्तवाकडेही त्यांनी लक्ष वेधले.सर्वसाधारणतः मंत्री उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने मुंबईला जाणे प्रत्येकाला शक्य होत नाही यासाठी आता या कार्यालयामार्फत सरकारशी थेट संवाद सुलभ झाला आहे. गेली वीस वर्षे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सतत संपर्कात असलेले संदीप जोशी यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी याच विश्वासाने देण्यात आली आहे हे निश्चित.