२९६ ग्राहकांवर एफआयआर
(Nagpur)नागपूर दि. १ जून २०२३ : महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभाग अंतर्गत कार्यरत सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने मागील एक वर्षात केलेल्या कारवाईत सुमारे १८ कोटींची वीज चोरी उघडकीस आणली असून वीज चोरीतील दंडाची रक्कम न भरणाऱ्या २९६ वीज ग्राहकांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(Vijay Singhal, Chairman and Managing Director of Mahavitran)महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) (Pramod Shewale)प्रमोद शेवाळे यांच्या निर्देशनानुसार नागपूर प्रादेशिक विभाग अंतर्गत उपसंचालक (सुवअं)(Sunil Thapekar) सुनील थापेकार यांच्या देखरेखी खाली नागपूर विभाग अंतर्गत मंडल स्तरावर १२ भरारी पथके व विभागीय स्तवरावर ३ भरारी पथके तसेच नागपूर व अकोला येथे सुरक्षा व अंमलबजावणी परिमंडल मध्ये कार्यरत अभियंते,अधिकारी व कर्मचारी वीज चोरीवर आळा घालण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात.
नागपूर प्रादेशिक विभाग अंतर्गत सुरक्षा व अंमजबावणी विभागाकडून एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत एकूण १३,५८५ ग्राहकांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान २,७१९ ग्राहकांकडे वीज चोरी आढळून आली. या ग्राहकांविरूध्द विद्युत कायदा २००३ सुधारित २००७ कलम १३५ अन्वये कारवाई करून १७.८२ कोटी रुपये इतक्या रकमेच्या वीज चोरीचे प्रकरणे उघडकीस आणली. तसेच विद्युत कायदा २००३ कलम १२६ अन्वये व इतर ७,९०९ प्रकरणांमध्ये ७१.७८ कोटी रुपये इतक्या रकमेची अनियमितता उघडकीस आणली. या कालावधीत एकूण ८९.७८ कोटी रुपये इतक्या रकमेचे निर्धारण करून त्यापैकी ४३.८२ कोटीची रक्कम संबंधित ग्राहकांकडून वसूल करण्यात आली. तसेच वीज चोरीची रक्कम न भरलेल्या २९६ ग्राहकां विरूध्द विविध पोलीस स्टेशन मध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तसेच एप्रिल महिन्यात नागपूर व पुसद येथे विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत १९१ संशयित ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली. त्यात १२१ वीज ग्राहक मेटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करीत असल्याचे आढळून आले. या ग्ग्राहकांविरुद्ध वीज कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय १५ ग्राहकककडे इतर अनियमितता आढळून आली.मोहिमेत ऐकून ७५ लाख रुपयांची वीज चोरीआढळून आली.
वीज चोरी सामाजिक अपराध आहे.त्यामुळे आपल्या परिसरात वीज चोरी होत असल्यास त्याबाबतची माहिती स्थानिक भरारी पथके, सुरक्षा व अंमलबजावणी कार्यालये किंवा महावितरणच्या जवळच्या कार्यालयास दयावी. वीज चोरी प्रकरणाची माहिती देण्या-या इसमास महावितरण कंपनीकडून योग्य ती बक्षिसाची रक्कम देण्यात येते.तसेच अशी माहिती देण्या-यांचे नाव सुध्दा गोपनीय ठेवले जाते.त्यामुळे याबाबत माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.