नागपूर -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गात सहभागी ६८२ तरूण प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांचे पूर्ण गणवेशात पथसंचलन रविवार दिनांक २१ मे रोजी सायंकाळी ६.१५ वाजता होणार आहे.
या पथसंचलनाचा मार्ग याप्रमाणे आहे. रेशिमबाग संघस्थान येथून डॉ. हेडगेवार स्मारक समिती, गेट क्र. १ मधून बाहेर डावीकडे गजानन चौक चंद्रभागा ट्रेडर्सच्या विरूद्ध बाजुच्या गल्लीमधून (उजवीकडे) पोलिस स्टेशनची उजवीकडील भिंतीपासून शारदा महाविद्यालय, तिरंगा चौकमार्गे रेशिमबाग परिसर परत असा मार्ग राहणार आहे. वर्गाचे सर्वाधिकारी कृष्ण मोहन, संघचालक ,पालक अधिकारी रामदत्त अखिल भारतीय सह सरकार्यवाह, वर्ग कार्यवाह एन टिप्पे स्वामी ,कार्यवाह , दक्षिण मध्य क्षेत्र आणि राजेश लोया, संघचालक , नागपुर महानगर व इतर अखिल भारतीय अधिकारी पथसंचलनाचे अवलोकन तिरंगा चौक समोर करतील. हे पथसंचलन बघण्यासाठी व स्वागत करण्यासाठी नागरिकांनी मोठया संख्येत उपस्थित राहावे असे आव्हान नागपूर महानगर संघचालक राजेशजी लोया व नागपूर महानगर सह संघचालक श्रीधरराव गाडगे यांनी केले आहे.