खा. संजय राऊत यांनी अल्पवयीन ‘हिक्टीम’ मुलीचा चेहरा सार्वजनिक केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, ह्यावर चिडून जात महाराष्ट्र राज्यातील कायदा सुव्यवस्था कोठ्यावर नाचत असल्याच्या त्यांच्या स्टेटमेंट वर, “अल्पवयीन प्रताडित मुलीचा चेहरा सार्वजनिक करता येत नाही” हे न्यायालयाचे दिशानिर्देश असतांना एका खासदार व संपादकाला हे माहीती नसणे, ह्याबद्दलचे आश्चर्य व्यक्त करत अशा गैरजबाबदार माणसाला खासदार पदावर राहण्याचा हक्कच नसून तत्काळ ह्या व्हिक्टीम मुलीची माफी मागावी व कारवाई ला सामोरे जावे, अशी भाजप प्रदेश सचिव व प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी मागणी केली.