मशाल आक्रोश मोर्चा

0

MSEB ने घेतला जीव – डॉ. महेंद्र धावड़े👇 स्व. साहेबराव करपे स्मृती कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र धावड़े,बळीराजा पार्टीचे संस्थापक अध्यक्ष , मुख्य वक़्ता बालासाहेब रास्ते , प्रदेश अध्यक्ष, बळीराजा पार्टी, प्रमुख उपस्थिती सरपंच सौ. प्रभावती काले ,पोलीस पाटील लक्ष्मनराव बोरकूट ,उपसरपंच रामेश्वर करपे, विदर्भ जन संपर्क प्रमुख मनीष वासे, यवतमाल जिल्हा महासचिव राजेश धोटे, वणी विधानसभा अध्यक्ष रामदास पखाले,पंजाब भारदे, सुधाकर बोखारे,भजन मंडल रामचंद्र खंदारे, दिलीप खंडारें ,प्रदीप गजभाट् हे होते, कार्यक्रमाचे सूत्र संचालन हरिभाऊ खंडारे यानी केले तर आभार रामदास पखाले यानी केले. डॉ. महेंद्र धावड़े यानी म्हनाले साहेबराव करपे नावाचा हा नाट्य कलावत , संगीत प्रेमी ,तब्बल १५ वर्षे तो गावाचा सरपंच होता. १२५ एकर जमीन व त्यासाठी जवळपास २४ माणसं त्यांच्या हाताखाली असायची. १० एच.पी.ची मोटर त्यांच्या विहिरीवर होती. शेतात नवीन प्रयोग करावे व त्यातून इतरांना प्रेरणा द्यावी म्हणून साहेबराव करपे यांनी शेतात केळी लावली. बँक व खाजगी कर्ज डोक्यावर होतेच. अशातच एम.एस.ई.बी.ने त्यांच्या घराची व शेतीची वीज कापली. आत्मसन्मावर दरोडा घालणारा हा प्रसंग साहेबराव यांच्या मनावर खोल परिणाम करून गेला. १९ मार्च १९८६ ला साहेबराव, मालती व विश्रांती (मुलगी), मंगला (मुलगी), सारिका (मुलगी), भगवान नावाचा मुलगा असे सर्व जनाचा MSEB ने जीव घेतला. कार्यक्रमानंतर मशाल आक्रोश मोर्चा काढन्यात आला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा