51 फुटाची गुडी

0

श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट तसेच लक्ष्मीनगर, बजाजनगर, सुरेंद्रनगर भागातील विविध संस्थांच्या वतीने बुधवारी 22 मार्च 2023 रोजी गुढीपाढव्याला हिंदू नववर्ष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि गिरीजा ओक गोडबोले यांच्या विशेष उपस्थितीत होणा-या समारंभात सकाळी 6 वाजता तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौक अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. याशिवाय 51 फूट उंच गुढी उभारून सामूहिक हनुमान चालीसा, सामूहिक रामरक्षा तसेच सामूहिक आरती केली जाईल.
या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहुन व्यापक प्रसिद्धी द्यावी, ही विनंती!
कार्यक्रमानंतर सायंटिफीक लॉन येथे अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा