मुंबई-उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट व्हॅनही कमी करण्यात आल्या असून उद्धव ठाकरे यांना झेड ऐवजी वाय दर्जाची सुरक्षा मिळणार आहे. सरकारने मातोश्रीवरील सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नवा वाद उभा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सरकारच्या निर्णयाचे कुठलेही आश्चर्य वाटत नसून सरकार सुडबुद्धीचे राजकारण करीत असल्याची टीका ठाकरे गटाकडून करण्यात आलीय.
गृह विभागाने ठाकरेंच्या सुरक्षेत कपातीचे कोणतेही कारण दिलेले नाही. यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. उद्धव ठाकरे यांच्यासाठी झेड प्लस तर आदित्य ठाकरे यांच्यासाठी वायप्लस सुरक्षा होती.