पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकर यांच्या स्नुषा आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष विक्रम सावरकर यांच्या पत्नी स्वामिनी सावरकर यांचे निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. सावरकरांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपण्याचे काम स्वामिनी सावरकर यांनी आयुष्याच्या अखेरपर्यत केले. स्वामिनी सावरकर यांनी विक्रम सावरकर यांना त्यांच्या संघटनात्मक कार्यामध्ये मोलाची साथ दिली होती. स्वामिनी सावरकर या पूर्वाश्रमीच्या मंदाकिनी गोखले म्हणून परिचित होत्या. नागपूर येथील पांडुरंग गोखले परिवारात त्यांचा १८ डिसेंबर १९३९ या दिवशी जन्म झाला. त्यांचे लग्न नारायणराव सावरकर यांचे पुत्र विक्रमराव यांच्याशी झाले होते. प्रज्वलंत’ या सावरकरांच्या विचारांवरील मासिकाचे कामकाज स्वामिनी या पाहत होत्या. मुरबाड (ठाणे) येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या उभारणीत तसेच संस्थेच्या कार्यात त्यांचा नेहमीच सक्रीय होत्या.