शरद पवारांनी भाकरीच नाही तर पूर्ण तवाच फिरवला – संजय राऊत

0

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या मनातील अस्वस्थता मला जाणवत होती. शरद पवारांनी भाकरी फिरवली नाही तर पूर्ण तवाच फिरवला. शरद पवारांनी राजकीय संन्यास घेतलेला नाही. ते देशाच्या राजकारणामध्ये काम करत राहतील. विरोधी पक्षाचे नेतृत्व करत राहतील. भाजप देशातून नेस्तनाबूत होणार तोपर्यंत ते काम करत राहतील असा विश्वास शिवसेना नेते खा संजय राऊत यांनी व्यक्त केला. बेळगावचा दौरा हा नियोजित दौरा आहे. मी सीमा भागात प्रचाराला जात आहे. तिथल्या जनतेच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील बेळगावात जाऊन सीमा बांधवांचा प्रचार करावा. मुख्यमंत्र्यांनी खरोखर तुरुंगवास भोगला असेल, तर सर्व बंधन जुगारून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला निघावं. मी आज बेळगाव कोर्टात हजर राहणार आहे आणि त्यानंतर नियोजित कार्यक्रमांना जाणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव व्हावा, म्हणून फडणवीस आणि बावनकुळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या फौजा पाठविल्या आहेत असा आरोप राऊत यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्याशी काल खूप वेळ या संदर्भात चर्चा केली. मी वाचलेलं नाही. परंतु ते आत्मचरित्र आहे. ती व्यक्तिगत भूमिका असेल या लोकांच्या भूमिका नाहीत. या सर्व घडामोडींवर सामनातून उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध होईल आणि या संदर्भात सडेतोड उत्तर सामनातून मिळतील. अनेक वर्ष राजकीय प्रवास आणि संघर्ष केलेल्या राजकीय नेत्याचं ते आत्मचरित्र आहे. जर त्यात काही आक्षेपार्ह असेल तर संबंधित लोक त्याला उत्तर देतील प्रत्येकाला बाजू मांडण्याचा अधिकार आहे. नाना पटोले अशी चोमडेगिरी काय करतात असा सवाल करतानाच राऊत म्हणाले, आपण आपल्या तोंडावर बंधन घाला आम्ही तुमच्याविषयी बोलायला गेलो तर चोमडे कोण आणि चाटू कोण हे देश ठरवेल. काँग्रेस पक्षाविषयी कोणतही विधान आम्ही केलेल नाही. त्यांच्याकडे कोणाचा रेडिओ आहे आम्हाला माहित नाही. या देशात लोकशाही आहे. असल्या घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार असेल, तर प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र कायम राहील पक्ष निघून जातील.