नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी बाबतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दखल घ्यायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आज केली.
संजय राऊत यांनाही धमकी दिली आहे, महाराष्ट्रात सध्या काय सुरू आहे,जाती जातीत तेढ निर्माण होत आहे, जेष्ठ नेत्याना धमकी दिली जात आहे, या संपूर्ण घटनेची चौकशी केली पाहिजे. कोल्हापुरात जे घडले त्याची दखल घेतली पाहिजे. राज्यात मी सुद्धा गृहमंत्री होतो, असे कधी झाले नाही. पोलिसांचा धाक कमी झाला का? असा सवाल उपस्थित करीत
सध्याच्या परिस्थितीत सुधारणा झाली पाहिजे, रोज नवीन नवीन घटना घडत आहेत, जशा निवडणूक जवळ येतील तशा घटना घडतील असे दिसत आहे. ओबीसी अध्यक्ष संदर्भात
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे याना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही असेही देशमुख म्हणाले
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















