शिंदे- फडणवीस सरकार वर्षपूर्ती निमित्त आनंदश्रमाला सजावट

0

 

(Thane)ठाणे– (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे,यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले,यामध्ये विशेष म्हणजे टेंभी नाका येथील आनंद आश्रमाला फुलांनी सजवण्यात आलेला आहे. (Balasaheb Thackeray) बाळासाहेब ठाकरे आणि (Aanand Dighe) आनंद दिघे या दोघांच्या फोटोंना फुलांनी सजावट करण्यात आली आहे. या ठिकाणी येऊन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नतमस्तक झाले. अनेक ठिकाणी (Shivsena)शिवसेना आणि (BJP)भाजप यांचे चिन्ह एकत्रित असल्याचे बॅनर लावण्यात आले. बरेचसे बॅनर वरती शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के आणि भाजपा आमदार निरंजन डावखरे यांचे एकत्रितपणे फोटो लावण्यात आलेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो अनेकदा बॅनरवर एकत्र छापले जातात,पण मधल्या काळात भाजप शिवसेनेमध्ये वादळ झाले होते.