समान नागरी कायद्यावर काँग्रेसची मुणगेकर समिती, अभ्यास करणार

0

 

(Mumbai)मुंबई : देशात समान नागरी कायदा लागू करण्यास काँग्रेसचा विरोध राहिलेला आहे. तथापि केंद्रातील मोदी सरकारने त्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने माजी खासदार (Dr. of Bhalchandra Mungekar)डॉ. भालचंद्र मुणगेकरांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची अभ्यास समिती नियुक्त केली आहे. या समितीला दोन महिन्यांत अहवाल देण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

या संदर्भात काँग्रेसच्या संघटन, (General Secretary, Department of Administration, Devanand Pawar) प्रशासन विभागाचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे की, या कायद्याचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही. देशात जर हा कायदा लागू झाला तर सर्व धर्मांना एकच कायदा लागू होईल. मात्र, अल्पसंख्याक समाज या कायद्याला त्यांच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप मानतो. वि‌विध धार्मिक समुदायामध्ये वेगवेगळे विचार व संभ्रमाची स्थिती आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. सदस्यपदी (Kumar Ketkar)खासदार कुमार केतकर, माजी खासदार (Hussain Dalwai)हुसेन दलवाई, (Former Minister Vasant Purke)माजी मंत्री वसंत पुरके, (Anis ahmed) अनिस अहमद, (Regional Vice President Kishore Gajbhiye)प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये, (Treasurer Amarjit Manhas) कोशाध्यक्ष अमरजित मनहास, (Janet D’Souza) जेनेट डिसुझा, विधी आघाडी अध्यक्ष (Adv. Ravi Jadhav) अॅड. रवी जाधव यांचा यात समावेश आहे.