
मुंबई (MUMBAI) ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार (SHRAD PAWAR) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली त्यांच्या या घोषणेनंतर कार्यकर्ते आणि नेत्यांना अश्रु अनावर झाले होते.शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण आज यासंदर्भात गठीत समितीने त्यांचा राजीनामा फेटाळला. समितीच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु झाला. एकंदरीत कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसत आहे.
शरद पवारांचा राजीनामा फेटाळणं हे अपेक्षितच – संजय राऊत
मुंबई- शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळला गेला हे अपेक्षितच आहे. मात्र पुढे काय होणार,हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे असे शिवसेनेचे खा संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत म्हणाले, हा सर्व त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय जरी असला, तरी विरोधी पक्षाच्या राजकारणावर या घडामोडींमुळे परिणाम होऊ शकतो. देशातील सर्व पक्षांचे या घडामोडीकडे लक्ष आहे आणि राहणार आहे.आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. जशा विरोधी पक्षांनी आपल्या भावना पवार साहेबांना कळविल्या तशाच उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या भावना शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत. राष्ट्रवादीकडे दुसरा समोर पर्याय नव्हता. हा पक्ष एक स्वतंत्र पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी देखील पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बोलवून त्या संदर्भातील निर्णय घेतले गेले होते. महाबळेश्वरच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये आणि अधिवेशनात हे निर्णय घेण्यात आले होते असा उजाळा दिला.
ON बारसू आंदोलन
– ही लोकशाही आहे.
– विरोधकांना परवानगी नाही परप्रांतीयांची दलाली करणारे जे आहेत, त्यांना परवानगी दिली आहे. ही एक नवीन लोकशाही महाराष्ट्रात सुरू झाली आहे.