भक्तीकुंज आश्रमात श्री संत गजानन महाराज प्रगट दिनोत्सव

0

नागपूर : सद्‌गुरु संत भाऊ महाराज संस्थापित श्री संत गजानन महाराज भक्तिकुंज आश्रम, चिखली- ले-आऊट, नवीन सुभेदार येथे श्री संत गजानन महाराज यांचा १४५ वा प्रगटदिनोत्सव’ सोमवार दि.१३ ते मंगळवार दि. 21 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात येत आहे. सोमवार दि. 13 रोजी ‘श्री’चे अभ्यंग स्नान, अभिषेक व सामुदायिक आरती या कार्यक्रमासोबत दुपारी 3 वाजता श्री’च्या पालखीची दिंडी अनेक भजन मंडळीसह, झाँकीद्वारे भव्य मिरवणूक काढण्यात येईल. मंगलवार दि.14 पासून ते दि 20 फेब्रुवारीपर्यंत भागवताचार्य ह.भ.प.अनिलजी अहेर महाराज यांचे श्री संत चरित्र भावकथा ‘सुश्राव्य प्रवचन, सकाळी 9 ते 11 व सायं. ६ ते ९ या वेळेत आयोजित केले आहे. रोज दुपारी भजन,नियमित सकाळ व सायंकाळी आरती व हरिपाठ वाचनाचा कार्यक्रम होईल. शनिवार दि १८ रोजी महाशिवरात्रीचे दिवशी श्री संत गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक महापारायण आयोजित केले आहे. मंगळवार दि. 22 रोजी ह.भ.प.प्रा. शांताराम ढोले महाराज यांचे दुपारी २ ते ४ पर्यंत गोपालकाल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. या संपूर्ण कार्यक्रमाकरिता कार्यकारी मंडळ संचालक डॉ. बापूरावजी कानतोडे, अध्यक्ष बबनराव भुयारकर व सचिव डॉ. दिनकर येवलेकर आदी प्रयत्नशील आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा