पुलवामाचा तो ‘काळा दिवस’

0

पुलवामा हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. पुलवामा जिल्ह्यात स्फोटकांनी भरलेल्या गाडीने जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याने सीआरपीएफच्या जवानांच्या बसला धडक दिली, त्यात ४० जवान शहीद आणि अनेक गंभीर जखमी झाले. पाकिस्तानमध्ये बसलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्यांनी या हल्ल्याचा कट रचला होता. पुलवामा हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. पुलवामा जिल्ह्यात स्फोटकांनी भरलेल्या गाडीने जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याने सीआरपीएफच्या जवानांच्या बसला धडक दिली, त्यात ४० जवान शहीद आणि अनेक गंभीर जखमी झाले.

 पुलवामा हल्ल्याला चार वर्षे पूर्ण; देशभरात आज पाळला जाणार ‘काळा दिवस’

Pulwama Attack 4th Anniversary: जगभरात आज ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जात असताना भारातात मात्र हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जात आहे. याच दिवशी २०१९ मध्ये जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात तब्बल ४० जवान शहीद झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेची आठवण करत दुख: व्यक्त केले आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. “ज्या जवानांना आम्ही पुलवामा हल्ल्यात गमावले, त्या वीर जवानांचे आजच्या दिवशी स्मरण होत आहे. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला आम्ही कधीही विसरू शकत नाही. त्यांचे साहस आम्हाला एक मजबूत आणि विकसित भारत बनवण्याची प्रेरणा देत असते.”

 

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून सुमारे २५०० जवानांना घेऊन सीआरपीएफचा ताफा बसमधून जात होता. हा ताफा पुलवामा येथे आल्यावर रस्त्याच्या बाजूने स्फोटकांनी भरलेली एक कार सीआरपीएफच्या ताफ्यासोबत जाणाऱ्या एका गाडीवर दहशतवाद्यांनी धडकवली. यावेळी झालेल्या भीषण स्फोटात ४० जवान शहीद झाले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे निष्पन्न झाले होते. तब्बल ३०० किलो स्फोटकांचा वापर या हल्ल्यासाठी करण्यात आला होता.

या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्मिरात बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांचा ठार मारले.

 

आज या घटनेला चार वर्ष पूर्ण झाले असल्याने केंद्र सरकार आणि देशभरात विविध श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा