एकल अभियान अंतर्गत मागील अनेक वर्षापासून देशभरात दुर्गम आदिवासी भागातील मुलांना शिक्षण देण्यात येत आहे. शिक्षणासोबतच मुलांना संस्कार, आणि आरोग्य शिक्षण देखील देण्यात येत आहे. यामुळे एकल अभियानाने देशातील दुर्गम भागात शिक्षणाची क्रांती घडवून आणली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
रविवारी एकल अभियान अंतर्गत सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी कब्बडी फायनल मॅचच्या उत्तराखंड आणि पूर्वी उत्तरप्रदेश च्या खेळाडूंना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. तसेच या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये ३१ राज्यांमधील सहभागी बाराशे खेळाडूंना सुद्धा शुभेच्छा दिल्या.