राज्यावर आस्मानी संकट, पुढचे ३-४ तास महत्त्वाचे

0

मुंबईः मान्सूनचे आगमन लांबले असल्याची चर्चा असतानाच आज संपूर्ण राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसामुळं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढच्या ३-४ तासांत वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या मुंबई विभागाने तसा इशारा दिला आहे.

IMDच्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई उपनगरासह, ठाणे पालघरमध्ये पाऊस होऊ शकते. त्याशिवाय, सातारा, सोलापूर, रायगड, धाराशिव, लातूर, परभणी, जालना, बीड, पुणे, हिंगोली आणि अहमदनगर या जिल्ह्यात पुढील तीन ते चार विजांच्या कडकडाटासह व ताशी ४० ते ५० वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

गुजरात राज्यात अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात त्याचा परिणाम जाणवत आहे. तर, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशातील विविध भागात मान्सूनपूर्व पावसाची प्रक्रिया सुरु झाली आहे. येत्या तीन ते चार तासांत पावसाचा जोर वाढू शकतो.