विज्ञान प्रदर्शनीतील काही अजब-गजब गोष्टी

0

‘मातीशिवाय शेती’


नागपूर : हो, आता या विज्ञान युगात मातीशिवायदेखील शेती करणे शक्य आहे. नागपुरातील अमरावती रोडवर आयोजित 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या विज्ञान प्रदर्शनीत मातीशिवाय केवळ पाण्याचा वापर करून घरच्या घरी कमीत कमी जागेत, टेरेसवर परसबाग तयार करण्याची माहिती देणारा स्टॉल इ-हॉलमध्ये लावण्यात आला आहे.
हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे न्युट्रीयन्ट पाण्याचा वापर करून पालेभाज्या, फळभाज्या, फुले, शोभीवंत रोपे यांचे उत्पादन घेता येते. विशेष म्हणजे यात कोणताही रासायनिक खते व किटकनाशकांचा उपयोग न करता केवळ सेंद्रीय पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.
वाहतुकीचे नियम पाळा, आणि बक्षीस मिळवा
नागपूर : ट्राफिक नियमांचे पालन न करणाऱ्यांना नेहमीच दंड केल्या जातो पण नियमांचे पालन करून गाडी चालवणाऱ्या चालकांना काय? आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. वाहतूक नियम पाळणाऱ्याना आता बक्षीस मिळणार आहे. 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या विज्ञान प्रदर्शनीत याबाबत माहिती देण्यात येत आहे.
रस्ते वाहतुक मंत्रालय व नागपूर महानग पालिका यांच्या सहकार्यातून एका खाजगी कंपनीद्वारे नागपूर शहरात प्रायोगिक स्तरावर पुढील महिन्यात हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच प्रकल्प असल्याचे सांगण्यात आले.
ट्राफिक रिवार्ड या ॲपद्वारे नोंदणी करणाऱ्या वाहनचालकांना त्यांचे वाहनावर लावण्यासाठी एक रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटीफीकेशन डिव्हाईस घरपोच मिळेल. या डिव्हाइसची फ्रीक्वेंसी कॅच करण्यासाठी नागपुरातील वेस्ट हाय कोर्ट रोड ते जपानी गार्डन रोड या मार्गावर प्रायोगिक स्तरावर 10 सिग्नलवर सेंसर लावण्यात आले आहेत. हे सेंसर सिंग्नलसोबत जोडण्यात आले असून आपली गाडी लाल, पिवळ्या व हिरव्या सिग्नलचे पालन करते का याची तपासणी ते करणार आहेत.नियमाचे पालन करणाऱ्या वाहनचालकाच्या मोबाईल ॲप खात्यात प्रत्येक सिग्नलवर 10 रिवार्ड पांईट जमा करण्यात येतील. या रिवार्ड पॉइंटचा उपयोग अर्थातच आपल्याला विविध कंपन्याची उत्पादने खरेदी करतांना सवलत मिळविण्यासाठी करता येणार आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा