चंद्रपूर. दुचाकीने चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून भरधाव एसटी बस येत होती. यामुळे दुचाकीचालक गोंधळला. हीबाब लक्षात येताच एसटीचालकाने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नत एसटी बाजुला घेतली. पण, रस्त्याचा निट अंदाज न आल्याने एसटी रस्त्यावरच उलटली. त्याखालीदबून दुचाकीस्वार दोघांचाही मृत्यू झाला (ST overturned, two killed). ही विचित्र आणि तेवढीच गंभीर दुर्घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास मूल-चामोर्शी मार्गावरील बोरचांदली उमा नदीजवळील (Near Borchandli Uma river on Mool-Chamorshi route) वळणावर घडली. या घटनेत दोन युवकांना प्राण गमवावे लागले. घटनेच्या वेळी एसटीत १० प्रवासी होते. सुदैवाने त्यांना फारशी दुखापत झाली नाही, वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी उलटली. मात्र, किरकोळ जखमा वगळता सुदैवाने एसटीतील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. संदीप रामदास कोकोडे (२८), प्रफुल्ल ऊर्फ भाऊराव गुरनुले (२४) दोघेही रा. फिस्कुटी, ता. मूल अशी मृतांची नावे आहेत.
घटनेतील मृतक संदीप व प्रफुल्ल हे दोघेही एमएच ३४ – सीए ३७०४ क्रमांकाच्या दुचाकीने मूल येथील राइस मिलकडे चालले होते. समोर असलेल्या चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी दुचाकीचा वेग वाढविला. ओव्हरटेक करीत असतानाच मूल येथून चामोर्शीकडे जाणाऱ्या एमएच ०७ सी ९१५८ क्रमाकांची एसटी बस समोर आली. दुचाकीचालक गोंधळला. त्याने करकचून ब्रेकही लावले. पण, तोवाचू शकणार नाही, हे लक्षात आल्यावर चालकांने प्रसंगावधान राखत एसटी शक्य तेवढी बाजुला घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एसटीच रस्त्यावर आडवी झाली. त्यापूर्वी दुचाकीचालक एसटीवर जोरदार धडकली. दुचाकीसह दोन्ही चालकही बसखाली आले. यात दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी तातडीने दाखल होऊन पंचनामा केला. युवकांचे मृतदेह मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यात आले. एसटीतील सर्व १० प्रवाशांना कुठेही मार लागला नाही.
वर्षभरापूर्वीच संदीप चढला होता बोहल्यावर
अपघातातील मृत संदीप कोकोडे वर्षभरापूर्वीच लग्नबंधनात अडकला होता. त्याला एक मुलगा आहे. त्यांच्या कुटुंबातील संदीप हा कर्ता पुरुष होता. आधीच घरची परिस्थिती बेताची असताना संदीपवर काळाने घाला घातल्याने कुटुंबच उघड्यावर पडले आहे. संदीप आणि प्रफुल्ल हे दोघेही फिस्कुटी या एकाच गावातील आहे. अपघाताची वार्ता गावात पोहचताच गावकऱ्यांचा धक्काच बसला. एकाच वेळी गावातील दोन तरुण गेल्याने गावकरी शोकाकुल झाले आहेत.