संपाचा जिल्ह्याला फटका, केवळ ११३० मे युनिट वीज निर्मिती

0

नागपूर : बुधवारी राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा जिल्ह्याला मोठा फटका बसला असून केवळ ११३० मेगावात युनिट युनिट वीज निर्मिती होऊ शकली महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाविरुद्ध कालपासून तीन दिवसांचा संप पुकारला होता. पहिल्याच दिवशी संपाचा फटका नागपूर जिल्ह्याला बसला. अदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देण्याला 90 टक्के कर्मचाऱ्यांचा विरोध होता. प्रामुख्याने
अदानी कंपनीला समांतर वीज पुरवठ्याचा परवाना देण्याला कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता. हिवाळी अधिवेशनात मोर्चा नेल्यानंतरही सरकारने न ऐकल्याने कर्मचाऱ्यांनी अखेर संपाचे हत्यार उपसले. नागपूर शहरानजीकच्या कोराडी आणि खापरखेडा केंद्रातील संच काल बंद होते. २१० मेगावॅटचे ३ संच काल सायंकाळपर्यंत बंद होते. तर कोराडी केंद्रातील ५०० मेगावॅटचा १ संच बंद होता. त्यामुळे नागपूर जिल्ह्याच्या विविध भागांतील वीज पुरवठा प्रभावित झाला.