चहा पिण्यासाठी आलेल्या तरुणांनी केली विद्यार्थ्यांला मारहाण

0

 

अमरावती: अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरज कॅफे समोर एका महाविद्यालयीन तरुणाला दोन तरुण क्षुल्लक कारणांवरून लोखंडी चहाच्या गंजाने मारहाण करत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला. एका तरुणाला दोन तरुण मध्यधुंद अवस्थेत डोक्यावर मारहाण करत असल्याने तो तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी जखमीचे परिस्थिती पाहून गुन्ह्यात वाढ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या हल्ल्यावरून गुन्हे दाखल केले, आरोपीना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.